vaccination:दादा पाटील महाविद्यालयात कोविड-१९ मोफत लसीकरण

  

कर्जत, दि. ८ (प्रतिनिधी) : येथील रयत शिक्षण संस्थेचे दादा पाटील महाविद्यालय आणि आरोग्य विभाग पंचायत समिती कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी मोफत

कोविड – १९ लसीकरण अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी दिली. शनिवार दि. ८ जानेवारी आणि सोमवार दि. १० जानेवारी 2012 या दोन दिवशी सकाळी ११ ते सायंकाळी ५ यावेळेत हे अभियान राबविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन प्राचार्य डॉ. नगरकर आणि आरोग्याधिकारी संदीप पुंड यांनी केले आहे. प्राचार्य डॉ. नगरकर, आरोग्याधिकारी डॉ. पुंड, प्रा.भास्कर मोरे, डॉ.प्रमोद परदेशी, प्रा. अशोक पिसे, प्रा. डॉ. वाल्मिक कापसे प्रा. प्रतापराव काळे, प्रा. प्रकाश धांडे यांच्या उपस्थितीत लसीकरण अभियानाचे उद्‌घाटन झाले. सुपरवायझर श्री.बचाटे, श्री.पवार यांच्यासह आरोग्य सेविका आणि आशा सेविका अशी १५ जणांची टीम लसीकरण मोहीम येथे राबवित आहेत. कोरोनाच्या गंभीर परिस्थितीत हे लसीकरण विद्यार्थ्यासाठी निश्चित फायद्‌याचे ठरणार आहे.

Join Buttons Join WhatsApp Group Join Telegram Channel

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Scroll to Top