Ramabai Ambedkar Jayanti: रमाबाई भिमराव आंबेडकर यांच्या विषयी माहित नसणाऱ्या काही खास गोष्टी !

Ramabai Ambedkar Jayanti: रमाबाई भिमराव आंबेडकर यांच्या विषयी माहित नसणाऱ्या काही खास गोष्टी !
Ramabai Ambedkar Jayanti


 Ramabai Ambedkar Jayanti: रमाबाई भिमराव आंबेडकर, यांचा जन्म ७ फेब्रुवारी इ.स. १८९८ रोजी एका गरीब कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील भिकू धुत्रे  व आई रुक्मिणी यांच्यासह रमाबाई दाभोळजवळील वंणदगावात राहत होते ,त्याच्या जयंती निमित्ताने आपण त्यान्च्या विषयी काही खास माहिती  घेणार आहोत .

आई वडिलांच्या मृत्यू नंतर रमाई मामा बरोबर मुंबई इथे राहण्यास आल्या ,रमाई व भीमरावांचे लग्न (Ramai and Bhimrao’s wedding) भायखळ्याच्या भाजी मार्केटमध्ये इ.स. १९०६ या वर्षी झाले. विवाहप्रसंगी बाबासाहेबांचे वय १४ वर्षे तर रमाईचे वय ९ वर्षे होते.

इ.स. १९२३ साली बाबासाहेब लंडनला गेले होते, त्यावेळी रमाईची खूप वाताहत होत होती. ती दुष्काळाच्या आगीत होरपळत होती. बाबासाहेबानी काही पैसे देखील पाठवले होते ,परंतु त्यांनी ते घेतले नाहीत .

रमाईने आपल्‍या निष्ठेने, त्यागाने आणि कष्टाने स्वतःच्या संसाराचा गाडा हाकलून बाबासाहेबांना ध्येय गाठण्यासाठी मदत केली.

डॉ. बाबासाहेब परदेशातून शिक्षण घेऊन मुंबईला आले तेव्हा , त्यांच्या स्वागताला सर्व आंबेडकरी समाज मुंबई बंदरात आला. 

रमाईला नेसण्यासाठी चांगली साडी नव्हती म्हणून त्यांनी छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेबांच्या सत्कारप्रसंगी दिलेला भरजरी फेटा नेसून बाबासाहेबांच्या स्वागतासाठी आल्या.

बाबासाहेब आंबेडकरांचे रमाबाईंवर निस्सीम प्रेम होते. तिचे कष्ट पाहून त्यांचे मन तुटायचे. त्यांनी आपल्या रामूला पाठवलेल्या पत्रात त्यांच्या या भावना प्रतिबिंबित व्हायच्या. ‘थॉट्स ऑन पाकिस्तान’ हा आपला ग्रंथ बाबासाहेबांनी आपल्या ‘प्रिय रामू’ला अर्पण केला.

ramai jayanti banner,रमाबाई आंबेडकर जयंती फोटो

रमाबाई आंबेडकर जयंती फोटो

Join Buttons Join WhatsApp Group Join Telegram Channel

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Scroll to Top