New clothes for destitute children:निराधार मुलांना नवीन कपडे घेऊन अमृतमहोत्सवी वाढदिवस साजरा

 

New clothes for destitute children:मिरजगाव  येथील निव‌त्त मुख्याध्यापक  महादेव नामदेव आखाडे (गुरूजी) यांचा ७५ वा वाढदिवस जामखेड व कुळधरण येथील अनाथ निराधार मुलांना नवीन कपडे व विधवा परितक्त्या महिलांनमानाची साडी देऊन साजरा केला.                                               मिरजगाव परिसरा निराधार मुलांना नवीन कपडे देऊन वाढदिवस साजरा त आगळा वेगळा अमृतमहोत्सवी वाढदिवस साजरा झाल्याने आखाडे कुटुंबाचे कौतुक होत आहे. वाढदिवसाच्या कार्यक्रमाची कोणतीही ढोंग बाजी न करता अनाथांचा नाथ होऊन कसलाही बडेजाव न करता निराधार बालकांमध्ये जाऊन त्यांना नवीन कपडे घेऊन ते घालायला लाऊन त्याच्या चेहऱ्यावरील आनंद पाहीला. तसेच मिरजगाव येथील ज्या शाळेत आपण शिकलो त्या शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप केले. तसेच आखाडे गुरूजी यांनी ज्या गावात नोकरी केली तेथील सहकरी शिक्षक, विद्यार्थी यांनीही अमृतमहोत्सवी कार्यक्रमासाठी हजेरी लावली.                                           अहमदनगर जिल्हा पत्रकार संघाचे संचालक जेष्ठ पत्रकार किशोर आखाडे त्यांचे बंधू सुधीर व बहीण मनिषा यांनी सामाजिक काम करून एक आदर्श निर्माण केला आहे. मिरजगाव येथे झालेल्या कार्यक्रमात माजी मंत्री प्रा.राम शिंदे यांनी आखाडे गुरूजींना शुभेच्छा दिल्या.

          जामखेड येथील निवारा बालगृहाचे संचालक अरूण जाधव म्हणाले की आखाडे गुरूजी हे गरीबांची जान असणारे व्यक्तिमत्त्व असल्याने त्यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने कोणत्याही भेट वस्तु न स्विकारता पुस्तके स्विकारली. हिच पुस्तके ते ग्रामीण भागातील ग्रंथालयाला देणार असल्याने मी भारावून गेलो. असे महात्मा फुलेंच्या विचारांतून तयार झालेली माणसेच समाज घडवत असतात.  पुष्कराज मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात कर्जत तालुक्यातील सर्व पत्रकार,  सामाजिक  राजकीय व धार्मिक क्षेत्रातील मान्यवर तसेच आखाडे गुरूजी यांचे सहकारी मित्र नातेवाईक उपस्थित होते. किशोर आखाडे यांनी सर्वांच, आभार मानले

Join Buttons Join WhatsApp Group Join Telegram Channel

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Scroll to Top