Lata Mangeshkar Death: भावपूर्ण श्रद्धांजलि संदेश , भावपूर्ण श्रद्धांजलि संदेश मराठी

 

Lata Mangeshkar Death: भावपूर्ण श्रद्धांजलि संदेश , भावपूर्ण श्रद्धांजलि संदेश मराठी

संगीत व गायन क्षेत्रातील ‘गानकोकिळा’ लतादीदी यांनी आज आपल्या सर्वांचा निरोप घेतला. संगीत व गायन क्षेत्रातील दीदींनी गायलेली गाणी आजही सर्वांच्या सदैव स्मरणात राहतील. दीदींना भावपूर्ण श्रद्धांजली.
#LataMangeshkar
लता दीदी…भावपूर्ण श्रद्धांजली जोडलेले हात
जागतिक संगीत विश्वातला एक अढळ ध्रुवतारा, स्वरसम्राज्ञी, गानकोकिळा, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे.  लता दीदींच्या निधनामुळे देशाने आज सर्वात मौल्यवान रत्न गमावले आहे.

Lata Mangeshkar Death: लता मंगेशकर, यांच्या विषयी माहित नसणाऱ्या काही खास गोष्टी

 गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं जाणं सुन्न करणारं आहे. त्यांचे स्वर आणि सूर अमर आहेत. लतादीदींना भावपूर्ण श्रद्धांजली

 देशाची शान आणि संगीत जगतातील शिरमोर स्वर कोकिळा भारतरत्न लता मंगेशकर जी यांचे निधन अत्यंत दु:खद आहे. त्या पवित्र आत्म्यास माझी भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांचे जाणे हे देशाचे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. सर्व संगीत साधकांसाठी त्या नेहमीच प्रेरणादायी होत्या.

 जगतविख्यात पार्श्वगायिका, गानकोकिळा, भारतरत्न लता मंगेशकर यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं. 

भावपूर्ण श्रद्धांजली

लता मंगेशकर यांची सर्वाधिक लोकप्रिय गाणी – Lata Mangeshkar’s most popular songs

 महान पार्श्वगायिका भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन ही देशातील प्रत्येक कुटुंबाकरिता दुःखद बातमी आहे.  हा दिवस अटळ आहे हे माहिती असून देखील हा दिवस येऊच नये असे वाटत होते. 

भारतरत्न लता मंगेशकर यांचे संगीत देश, भाषा व काळ यांच्या सीमा उल्लंघून थेट अंतरात्म्याला जागवणारे होते.

433 रुपयात मध्ये मागवा , Micromax In Note 

गेल्या आठ दशकांहून अधिक काळ जगभरातील अगणित संगीतप्रेमींचं भावविश्व समृद्ध करणारा दैवी स्वर आज अखेर शांत झाला. जगतविख्यात पार्श्वगायिका, गानकोकिळा, भारतरत्न लता मंगेशकर यांचं आज वृद्धापकाळानं निधन झाले. 

भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो हीच प्रार्थना.

जगभरातील कोट्यवधी संगीतप्रेमींच्या कानांना तृप्त करणारे अलौकिक स्वर आज हरपले.

लतादीदींच्या आवाजाच्या परीसस्पर्शाने अजरामर झालेल्या गीतांच्या माध्यमातून हा स्वर आता अनंतकाळ आपल्या मनांमध्ये गुंजन करत राहील.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

 




Join Buttons Join WhatsApp Group Join Telegram Channel

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Scroll to Top