Karjat: सीना नदीपात्रात भरदिवसा मोठया प्रमाणात वाळू चोरी, प्रशासनाचे दुर्लक्ष

 भरदिवसा वाळूउपसा आणि वाळू वाहतूक बोकाळली, प्रशासनाची डोळेझाक 

कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत तालुक्यातील सीना नदीपात्रात भरदिवसा प्रशासनाच्या नाकावर टिच्चून वाळूउपसा होत असून भरदिवसा मिरजगाव शहरातून वाळूची अवैध वाहतूक होत आहे. मात्र  अवैध वाळू उपश्याकडे आणि वाळू वाहतुकीकडे तालुका प्रशासनाचा कानाडोळा होत असल्याचे दिसून येत आहे. भरदिवसा होत असलेला वाळू उपसा आणि वाहतूक प्रशासनाला दिसून येत नाही का ? अवैध वाळू उपश्यावर कारवाया करून अवैध वाळूवर धडक कारवाया होत असल्याचे दाखवून दिले जातेय का ? मात्र दररोज होणारी अवैध वाळू वाहतूक आणि वाळू उपसा मात्र काही थांबल्याचे दिसून येत नाही. दिवसेंदिवस वाळू तस्करांची मुजोरी वाढत असून अनेक ठिकाणी वाळूचे ढिगारे वाळू तस्करांनी करून ठेवले आहेत हे मात्र प्रशासनाच्या नजरेत येत नसल्याचे नागरिक सांगत आहेत. अवैध वाळू उपश्याकडे प्रशासनाचे होत असलेले दुर्लक्ष म्हणजे एक तर प्रशासन कुठेतरी कमी पडत आहे किंवा वाळू तस्करांसोबत लागेबांधे आहेत असेच म्हणावे लागेल. अवैध वाळू वाहतुकीमुळे रस्त्यांची बिकट अवस्था होत चालली असून अवजड वाहतुकीमुळे रस्ते खचत आहेत. याचा सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. भरदिवसा होणारा वाळू उपसा आणि अवैध वाहतूक बोकाळत चालली असून या वाळू उपश्याला नेमका आशिर्वाद कोणाचा ?

Join Buttons Join WhatsApp Group Join Telegram Channel

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Scroll to Top