Karjat: आ. रोहित पवारांनी दिलेला शब्द पाळला, मतदारसंघातील तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर

कर्जत जामखेड मतदारसंघातील कोरोनाकाळात प्रलंबित असलेल्या तीर्थक्षेत्राच्या विकासाचा निधी अखेर आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्यानंतर मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार कर्जत जामखेड तालुक्यातील 7 तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी एकूण 4 कोटी रुपयांचा भरघोस निधी महाराष्ट्र शासनातर्फे उपलब्ध केला जाणार आहे. आमदार रोहित पवार यांनी आपल्या मतदारसंघासह नगर जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचा विकास व्हावा यासाठी स्थानिक आमदारांना बरोबर घेऊन पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांची भेट घेतली होती. तसेच पर्यटन विभागाच्या प्रधान सचिवांशीही यासंबंधी चर्चा केली होती. 

गोदड महाराज मंदिरासाठी 78.58 लाख रुपये, जगदंबा देवी मंदिर राशीन 75.6 लाख रुपये, दुर्योधन मंदिर दुर्गाव 85.60 लाख रुपये, विठ्ठल रुक्मिणी मंदिर धनेगाव 37.74 लाख रुपये, अरण्येश्वर मंदिर अरणगाव 38.26 लाख रुपये, अन अखेरी देवी मंदिर फक्राबाद 38.02 लाख रुपये आणि नंदादेवी मंदिर नान्नज जामखेड 47.80 लाख रुपये एवढा निधी मंजूर झाला आहे.

राज्यशासनामार्फत मंजूर झालेल्या निधीचा योग्य वापर करून वरील  स्थळांचा कायापालट  केला जाईल असे आश्वासन आमदार रोहित पवार यांनी दिले. तसेच हा भरघोस निधी मंजूर केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे आणि जिल्ह्यातील सर्व आमदारांचे रोहित पवारांनी आभार व्यक्त केले आणि कोरोनामुळे मतदारसंघाच्या विकासात कसलीही बाधा येणार नाही, असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी जनतेला दिला तसेच कर्जत जामखेडच्या जनतेला दिलेला शब्द आमदार रोहित पवार यांनी पाळला असल्याचं यावरून स्पष्ट होत आहे.

Join Buttons Join WhatsApp Group Join Telegram Channel

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Scroll to Top