journalism field: पत्रकारितेच्या क्षेत्रात रोजगाराच्या मोठ्या संधी

 

 journalism field:आजच्या काळात वृत्तपत्रे, दूरदर्शन, वेब चॅनल्स ही प्रभावी प्रसारमाध्यमे असून, समाजात विधायक परिवर्तन व्हावे ,समाजातील अज्ञान नष्ट करून त्यांना विज्ञानवादी बनवावे, विचार जागृती घडवून समाजाचे वैचारिक भरण-पोषण करावे या हेतूंनी  ही प्रसारमाध्यमे आजच्या काळात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत .याशिवाय प्रशासनावर व लोकशाहीवर अंकुश ठेवण्याचे कामही ही प्रसारमाध्यमे करीत आहेत. या क्षेत्रात बातमी लेखक, वृत्तसंपादक, कार्यकारी संपादक, मुख्य संपादक ,स्तंभलेखक, जाहिरात लेखक ,मुद्रितशोधक, टंकलेखक ,चित्रपट व नाट्य समीक्षक ,क्रीडा वृत्तलेखक अशा  अनेक जागांवर  विद्यार्थ्यांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. असे प्रतिपादन   पत्रकार निलेश दिवटे यांनी केले.

    ‌‌         येथील दादा पाटील महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत प्रमुख व्याख्याते म्हणून’ पत्रकारितेच्या क्षेत्रातील रोजगाराच्या संधी’ या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संजय नगरकर हे होते.

       अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. नगरकर म्हणाले की, विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणाबरोबरच करिअर करण्यासाठीच्या इतर क्षेत्रातील  नवीन संधींचा शोध घेतला पाहिजे. कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे  याविषयीचे उच्च ध्येय ठेवून, कष्ट करण्याची जिद्द असेल तर नवमाध्यमे व समाजमाध्यमांमध्ये करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. फेसबूक,  व्हाट्सअप, ब्लॉक युट्यूब यासारख्या सोशल डिजिटल प्रसारमाध्यमांमधून आपले विचार आपण व्यक्त करू शकतो. ज्यांच्याकडे समाज विषयक ,देशविषयक विधायक विचार आहेत ते विद्यार्थी या माध्यमातून विचार मांडू शकतात व आपले करियर घडवू शकतात.

           या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.भास्कर मोरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सदाशिव शिंदे व प्रा. वृद्धेश्वर गरुड यांनी केले. आभार डॉ. भारती काळे यांनी मानले .यावेळी प्राचार्य डॉ.नगरकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त महाविद्यालयाच्या ग्रंथालयाला रुपये दोन हजारांची, तर मराठी विभागीय ग्रंथालयाला रुपये एक हजारांची पुस्तके भेट दिली.

Join Buttons Join WhatsApp Group Join Telegram Channel

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Scroll to Top