E-pos machine server down:कर्जत तालुक्यातील सर्वच रेशन दुकानांमध्ये ई – पॉस मशिन सर्व्हर डाऊन

E-pos machine server down: रेशन , धान्य वितरण व्यवस्थेतील ई – पॉस मशिन वारंवार बंद पडत असल्यामुळे शिधावाटप दुकानात धान्य असूनही ते लाभार्थांना मिळत नसल्याने गरिबांना धान्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.  रोजंदारीवरील नागरिकांना कामाचे खाडे करून गेली आठ ते दहा दिवसांपासून संपूर्ण दिवस रेशन दुकानासमोर घालवावा लागत असल्याने कर्जत   तालुक्यातील   खेड येथील नागरिक चांगलेच वैतागलेले आहेत . कर्जत तालुक्यातील सर्वच रेशन दुकानांमध्ये हा सावळागोंधळ सुरू आहे .

कोरोनामुळे गरीब नागरिक धान्यापासून वंचित राहू नये म्हणून मार्च महिन्यापर्यंत केंद्र सरकारने निःशुल्क धान्य वाटपाची घोषणा केली , केंद्र सरकारने मोफत धान्य देण्याची घोषणा केली असली व प्रत्यक्ष धान्य गेली दीड वर्षापासून धान्याचे सुरळीत वाटप केले होते परंतु गेल्या पाच सहा महिन्यात धान्य वाटपात सावळा गोंधळ उडाला आहे. याकडे संबंधित अधिकारी वर्गाने लक्ष देण्याची गरज आहे. 

 ई – पॉस मशिन वारंवार बंद पडत असल्याने हे धान्यच मिळत नाही . तीन – चार महिन्यांपासून सातत्याने ई पॉस मशिनचा सर्व्हर डाऊन झाल्याने रेशन वितरणाचे काम अत्यल्प वेळ चालत आहे . एका दुकानदाराला दिवसभरात एक ते दोन ग्राहक करण्यासाठी एक ते दीड तासाचा वेळ लागत आहे . परिणामी दुकानासमोर लाभार्थ्यांची गर्दी होत आहे . ई – पॉस मशिन वारंवार बंद पडत असल्याने मिळत नाही मात्र दुकानात धान्यसाठा शिल्लक असूनसुद्धा मशिनवर धान्य उपलब्ध   

नसल्यामुळे धान्य देता येत नाही . यामुळे दुर्बल घटकांतील लाभार्थ्यावर उपाशी राहण्याची वेळ आली आहे .

अधिकाऱ्यांचे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष 

तांत्रिक अडचण , सर्व्हर डाऊन आदी समस्यांबाबत विभागातील अधिकाऱ्यांना वारंवार सांगितले जात आहे . दुकानदारांचे म्हणणे आहे की , सात ते आठ वेळा प्रयत्न केल्यानंतर मशिनमध्ये बिल दर्शविले जाते . यामुळे दुकानदारांच्या अडचणी वाढल्या आहेत . ते धान्य वाटप करू शकत नाही . अनेक कार्डधारकांना रेशन न घेताच परत जावे लागत आहे .

Join Buttons Join WhatsApp Group Join Telegram Channel

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Scroll to Top