champa shashti 2021 : तळी उचलणे , जाणून घ्या कारण आणि महत्व

 

अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत श्री खंडोबा (जेजुरी) हे आहेत. प्रत्येकाच्या  घरी श्री खंडोबांचा चंपाषष्टी उत्सव साजरा केला जातो. यादिवशी तळी उचलली जाते .  घरातले 5 पुरूषमंडळी गोल बसतात, एका मोठ्या भांड्यामधे  मध्ये कलश ठेवतात. पाच वेळा वर खाली वर खाली करतात आणि पाचही वेळा “सदानंदाचा येळकोट, खंडेरायाचा येळकोट” असं म्हणत भंडारा उधळतात. (काही लोकांकडे कलश न ठेवता ताम्हणात मध्ये कुळदेव (कुलदैवत) ठेवतात.) त्यानंतर नारळ फोडतात आणि त्याला आतून भंडारा लावतात त्या नंतर तो प्रसाद सगळ्यांना वाटतात. इथे खंडोबाची मूर्ती देखील ठेवली जाते .

मणीसुर आणि मल्लासुर या दैत्यांचा संहार मार्तंड या देवाने केल्यामुळे त्या देवतेला मल्लहारी म्हणतात. देवाने त्यांचा संहार केल्या नंतर ऋषीमुनींना आणि सर्व नगरवासियांना जो आनंद झाला, त्यांनी त्या आनंदात मल्हारी मार्तंडाचा जयजयकार केला. त्याचे हे प्रतिक आहे. त्याचा उदो उदो हा हेतु आहे.

खोब-याचे तुकडे का वाटावे?

आपण सर्व एकच आहोत. त्या दिव्य शक्तीचा एक अंश आहोत. त्याचे विभागलेल्या भागाचे प्रतिक हि आठवण रहावी म्हणून खोब-याचे तुकडे भंडारा लावुन वाटतात.

संदर्भ : वेबसाईट्स 

Join Buttons Join WhatsApp Group Join Telegram Channel

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Scroll to Top