Bipin Rawat Helicopter crash: बिपिन रावत मराठी माहिती , नेमकं काय झाले ? Bipin Rawat Marathi Information

कोण होते बिपीन रावत 

 बिपिन रावत (Bipin Rawat) हे देशातील पहिले CDS अधिकारी म्हणजेच आहेत. सीडीएसचे काम लष्कर (Army), हवाई दल (Air Force) आणि नौदल (Navy) यांच्यात समन्वय साधणे आहे. संरक्षण मंत्र्यांच्या One of the key advisors ते एक आहेत. तिन्ही सैन्यांमध्ये समन्वय साधण्याचे महत्त्वाचे काम त्यांच्याकडे आहे.

बिपिन रावत यांचा जन्म 16 मार्च 1958 रोजी डेहराडून येथे झाला. बिपिन रावत यांचे वडील एलएस रावत हेदेखील लष्करात होते आणि ते लेफ्टनंट जनरल एलएस रावत म्हणून ओळखले जात होते. त्यांचं बालपण सैनिकांमध्ये गेलं. त्यांचं प्राथमिक शिक्षण शिमल्यातल्या सेंट एडवर्ड स्कूलमध्ये झालं. त्यानंतर त्यांनी इंडियन मिलिटरी अकादमीत प्रवेश घेतला आणि डेहराडूनला गेले. त्यांची तिथली कामगिरी पाहून त्यांना पहिलं सन्मानपत्र मिळालं, ज्याला SWORD OF HONOURनं सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी अमेरिकेत शिक्षण घेण्याचं ठरवलं आणि ते अमेरिकेला गेले, तेथे त्यांनी सर्व्हिस स्टाफ कॉलेजमध्ये पदवी प्राप्त केली. सोबतच त्यांनी हायकमांडचा कोर्सही केला होता.

Bipin Rawat Helicopter crash नेमकं काय झालं ?

तामिळनाडूच्या कुन्नुर  लष्कराच्या हेलकॉप्टरला अपघात झाला, या हेलिकॉप्टरमध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत हे होते असं भारतीय वायूसेनेने सांगितल.

या हेलिकॉप्टरमध्ये एकूण 14 जण होते. त्यांपैकी पाच जणांचा मृत्यू झाला आहे. दोन  जणांची प्रकृती गंभीर आहे. तामीळनाडूचे मंत्री रामचंद्रन यांनी घटनास्थळी पोहोचल्यानंतर ही माहिती दिली.  रावत यांच्यासोबत त्यांच्या पत्नी देखील होत्या असं सांगितलं जात आहे.  स्थानिक सैन्य अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून स्थानिकांनी 80 टक्के भाजलेल्या दोन व्यक्तींचे देह रुग्णालयात पोहोचवल्याचे सांगण्याच येत आहे. काही देह पर्वताच्या उतारावर पडल्याचे दिसून येत आहेत आणि त्यांना बाहेर काढण्याचे व ओळख पटवण्याचे काम सुरू आहे असं एएनआयच्या सूत्रांनी सांगितले आहे.

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपीन रावत यांचं हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झालं आहे.

परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती प्रदान करो हीच प्रार्थना! भावपूर्ण श्रद्धांजली!! #BipinRawat pic.twitter.com/dbZjEanGma

— ITech मराठी (@itechmarathi) December 8, 2021




 

Join Buttons Join WhatsApp Group Join Telegram Channel

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Scroll to Top