Nilesh Lanke VS Sujay Vikhe LIVE | Nagar Lok Sabha Election Result | लंके VS विखे काटेची टक्कर
देशात नुकत्याच १८ व्या लोकसभेसाठी निवडणुका पार पडल्या असून, उद्या ४ जून रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नगर जिल्ह्यातील निवडणुकीत विशेषतः निलेश लंके आणि सुजय विखे यांच्या मधील तगड्या लढतीने चर्चेचा विषय झाला आहे.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात सुजय विखे यांनी पहिल्या फेरी अखेर 3613 मतांनी आघाडी घेतली होती. पहिल्या फेरीत सुजय विखे यांना 25653 एवढी मतं मिळाली, तर निलेश लंके यांना 22040 एवढी मतं मिळाली. या मतमोजणीच्या दुसऱ्या फेरी अखेर, सुजय विखे 4729 मतांनी आघाडीवर आहेत.
मतमोजणी केंद्रावर जोरदार हालचाली सुरु आहेत. सुजय विखे यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, तर निलेश लंके यांच्या समर्थकांनी अद्यापही निकालाची प्रतीक्षा करत संयम दाखवला आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाची नगरमध्ये ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. पवारांच्या रणनीतीमुळे लंके यांना या निवडणुकीत मोठे यश मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती.
उद्या सकाळपासूनच मतमोजणीचे अंतिम निकाल हाती येण्यास सुरुवात होईल आणि तेव्हा कोणाचा विजय होईल याचा स्पष्ट अंदाज येईल. नगरमध्ये सुरु असलेल्या या लढतीत कोण बाजी मारणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.