आता WhatsApp वर फोटोज आणि व्हिडिओज एकदाच पाहता येणार

Photo - WhatsApp
WhatsApp

WhatsApp new features: आपल्या फोनवर फोटोज किंवा व्हिडिओज पाठवणे घेणे  हे आपल्या आयुष्याचा फार मोठा भाग बनले आहे, पण आपण सामायिक केलेल्या सर्वच गोष्टी कायम स्वरूपी डिजिटल रेकॉर्ड बनून राहिल्या पाहिजेत असं नाही. काही फोन्सच्या बाबतीत, साधा फोटो घेण्याचा अर्थसुद्धा कॅमेरा रोलवर कायमची स्पेस घेणे असा होतो. परंतु व्हाट्सअँप ने आणलेल्या या नवीन उपडेट मुले आपला फायदा होणार आहे .

काय आहे , WhatsApp new features

‘एकदाच पहा फोटोज आणि व्हिडिओज’ (‘Take a look at photos and videos’) हे फीचर आज उपलब्ध करून दिले आहे , ज्यामुळे वापरकर्त्यांना त्यांच्या गोपनीयतेवर अधिक नियंत्रण मिळेल. जेव्हा तुम्ही या मोड मधून फोटो पाठवलं जाईल ते पाहणाऱयाला एकदाच पाहता येणार आहे नंतर ते चॅट मधून नाहीसे होतील

दाहरणार्थ, तुम्ही विकत घेण्यापूर्वी दुकानात घालून बघितलेल्या कपड्यातील फोटो किंवा क्षणभरात दिलेली त्वरित प्रतिक्रिया अथवा वाय-फाय पासवर्डसारखी संवेदनशील माहिती एकदाच पाहण्यासाठी पाठवली असेल. तर समोरचा व्यक्ती ते पाहिलं आणि नंतर तो फोटो नाहीसा होईल .

व्हॉट्सअँप बिझनेस अँप ( WhatsApp Business App )

Made In India’ 5G : एअरटेल आणि टाटा ग्रुप करणार भारतासाठी 5 जी नेटवर्क सोल्यूशन्स

WhatsApp वर पाठवलेल्या सर्वच वैयक्तिक मेसेजेसप्रमाणे, एकदाच पहा मीडिया एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित केलेला आहे (Media is protected by end-to-end encryption)म्हणून WhatsApp तो पाहू शकत नाही. हे नवीन “एक-वेळ” आयकॉनने स्पष्टपणे चिन्हांकित केलेले असतील.फोटो किंवा विडिओ पाहिला गेल्यानंतर, चॅटमध्ये त्यावेळी काय होत होते याबाबत कोणताही संभ्रम टाळण्यासाठी, मेसेज “उघडला” असा दिसू लागेल.

या आठवड्याच्या सुरुवातीला आम्ही हे फीचर सर्वांना उपलब्ध करून देत आहोत आणि वैयक्तिक आणि नाहीसा होणारा मीडिया पाठविण्याच्या या नवीन मार्गाबद्दलचा तुमचा अभिप्राय जाणून घेण्यास उत्सुक आहोत.

हे कसे वापरून पाहायचे याविषयी अधिक माहिती इथे पाहू शकता

Leave A Reply