ऑनलाईन शिक्षण ,शिक्षक दिन निमित्त विशेष लेख – ऐश्वर्या बनसोडे

ऑनलाईन शिक्षण निबंध मराठी
ऑनलाईन शिक्षण निबंध मराठी

गुरू ब्रह्मा गुरू विष्णु, गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नम:

मा म्हणजे आई तर स्तर म्हणेच आई , च्या स्थरावर (दर्जा/जागेवर) येऊन शिकवणारे मास्तर. पण खरंच आज शिक्षक दिन फक्त शिक्षकांबद्दलचा आदर (respect for teachers), प्रेम व्येक्त करण्यासाठी करावा का? आजच्या ग्लोबल जगात माहिती भेटते की कुठेही म्हणाल तर गूगल आहे, यू टुब आहे, सोशल मीडिया आहे, वेग वेगळे आप्स आहेतच की जग भरातल कोणतही कोणतही शिक्षण कुठेही भेटू शकत आणी तेही अवग्या सेकंदात मग प्रश्न येतो शिक्षक कश्यासाठी, का???

एक engginer चुकला एक ईमारत ढासाळेल, एक डॉक्टर चुकला तर एक पेशंट दगावेल पण विद्यार्थीच जर चुकत गेले तर ?

म्हणून महत्त्वाचं हे की ह्या इंटरनेटच्या/ ग्लोबल जगात काय बरोबर काय आहे (What’s up with the internet / global world?) आणि काय चुकीच आहे हे समजून सांगणार दिशादर्शक ‘ मास्तर ‘ जो एका पिढीला घडवेल, देशाचा आधार मजबूत करेल, मार्गात काटे कोठे आहेत, कोणता रस्ता योग्य आणि कोणता चुकतोय हे सांगणारे मार्गदर्शक (सर , गुरुजी, शिक्षक, मास्तर) हे महत्त्वाचे आहेत.

काही दिवसांपूर्वी एक शिक्षक आणि अधिकाऱ्याचा फोन कॉल वरील सवांद ऐकला विषय होता विद्यार्थ्यांचा वार्षिक अहवाला बाबत.. एका दुर्गम गावातील विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षभरात जे काही ऑनलाईन वर्ग (Online classes ) चालू आहेत त्यातला एकही अटेंड केला नाही, त्यांचा वार्षीक अहवाल तयार करायचा कसा? अहवालात नेमक लिहायच काय म्हणून त्या शिक्षकाने अहवालच तयार केला न्हवता कारण त्यासाठी मुलांनी अभ्यास करन गरजेचं आहे हे त्याचं प्रामाणिक मत, त्यावर अधिकारी बोलले जर मूल नसतील तर तुम्हीच त्यांचा अभ्यास करा , तुमच्या मनाने त्यांना काय ते मार्क्स देऊन त्यांचा अहवाल सादर करा..!

आता मी हे का लिहितोय, मुद्दा एकदम साधासुधा आहे पण तितकाच गंभीरही कारण आपण ज्या विद्यार्थ्यांना देशाचं भविष्य समजतोय ते भविष्य हरवत चाललय. आता तस पहिला गेलं तर प्रत्येक विद्यार्थ्यांच भविष्य एका मोबाईल मध्ये कैद झालय, पण खरच त्या मोबाईल या माध्यमातून विद्यार्थी घडतायेत का?

शिक्षक दिनानिमित्त मराठी कविता – Marathi Poem On The Occasion Of Teacher’s Day (Vaibhavi Kapil Dalvi)

      कोरोना,त्याच राजकारण, किती मेले ,किती जगण्यासाठी धडपडतायेत या पलीकडच विश्वच अस्तित्वात नाही असं झालय. तरीसुद्धा या पलीकडे जाऊन 1ली ते 7वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा विचार करता म्हणजे प्रत्येक माणूस हा विद्यार्थी असतोच ती गोष्ट वेगळी पण ज्या वयात आपल्या आयुष्याची पायाभरणी होत असते तेच आयुष्य या सोशल मीडिया च्या माध्यमातून पोकळ होत चाललय हे कुणाच्याच ध्यानात न येन ही खरच लाजिरवाणी बाब आहे..शाळा,अभ्यास,ग्रहपाठ,खेळ,मित्र,शिक्षक-विद्यार्थी नात यातल्या किती गोष्टी सध्याच्या परिस्थिती टिकून आहेत..

गेल्या वर्षभरात जे काही घडतंय ते लक्ष्यात घेता याची अपेक्षा ठेवणेही चुकीच आहे हे ही कळतय.. पण जो विद्यार्थी पुस्तक ,वाह्यात रमायचा तो आता मोबाईल मध्ये स्वतःला कैद करून घेतोय ही बाबही लक्ष्यात घेणं तितकंच महत्वाच वाटतंय. कोरोना कधीतरी संपुष्टात येईलच पण जो विद्यार्थी आता मोबाईल मध्ये कैद होतोय तो नंतर त्यातून बाहेर निघू शकेल? त्याचे परिणाम काय होतील? त्यांचं सोडा आज प्रत्येक व्यक्तीला या मोबाईल च व्यसन लागलय आश्यामध्ये आपल्या देशाच्या भविष्याकडून आपल्याला नेमक्या काय अपेक्षा आहेत. कुठल्याही गोष्टीला चांगल्या ,वाईट दोन बाजू असतात मान्य पण नेमक्या कुठल्या गोष्टींचा संसर्ग आता जास्त होतोय हे लक्षात घेनहि तितकंच गरजेच वाटत. जर तुम्ही ,मी आणि बरेच जाणकार मंडळीही या मोबाईल नावाच्या मृगजळात अडकू शकतात..तर अभ्यासाच्या नावाखाली दिवस ,दिवस मोबाईल घेऊन बसणाऱ्या विद्यार्थ्यांच काय ?

Teacher Day : शिक्षक दिना निमित्त खास कविता आणि शुभेच्छा !

  •        परत शाळा चालू होतील?
  •        शाळेत येणाऱ्या मुलांपैकी किती विद्यार्थी असतील?
  •        येणाऱ्या परिस्थितीला जवाबदार कोण राहील पालक,शिक्षक,की परिस्थितीच?
  •        ज्या विद्यार्थ्यांना आपण देशाचं भविष्य समजतो त्या भिविष्याच्या भविष्याच काय?
  •        हे आणि असे बरेच प्रश्न आहेत जे तुम्हालाही पडत असतील तेव्हा सावध व्हा आणि आता उत्तर सापडू शकत ते शोधा ..
  •        नाहीतर आयुष्य आणि भविष्य दोन्ही कायमचेच बिना उत्तराचे प्रश्न होऊन बसायला वेळ लागणार नाही..

कधीकाळी हा देश महासत्ता होण्याचे स्वप्न कलामांनी पाहिलं होतं. कलामंच स्वप्न जरी पूर्ण झालं नसलं तरी त्या स्वप्नाची जबाबदारी आपल्या प्रत्येकावर आहे करोणा ,महामारी ह्या मुळे चालू झालेलं ऑनलाईन शिक्षण जरी एक बाजू असली तरी दुसरी बाजू पाहता , एका विद्यार्थ्याच्या जीवनात शिक्षक किती महत्त्वाचं पात्र निभावत असतात हे सांगण्यासाठी कुसुमाग्रजांची “पाठीवरती हात ठेऊनी फक्त लढ म्हणा” ही ओळच पुरेशी आहे .

शिक्षक विद्यर्थ्यांसाठी काय करु शकतात मग २०२० ची हेडलाईन सगळ्यांच्याच भुवया वर उंचावते आण आश्चर्यांन तोंडावर बोट ठेवायला लावते,

“मराठी माणसाचा जगात डंका ! सोलापुरातील शिक्षक रणजित डिसलेंना प्रतिष्ठेचा 7 कोटींचा “ग्लोबल टीचर पुरस्कार’ जाहीर”.

जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक रणजित डिसले आपल्या वाढदिवसावेळी भेट म्हणून वडिलांकडे लॅपटॉप मागतात आणि आपल्याच विद्यार्थ्यानंसाठी नव्हे तर जगभरातील प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एक वेड स्वप्न (#globledream) पाहतात आणि एक दिवस ह्याच कष्टाचं चीझ समोर येत

युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ‘ग्लोबल टीचर प्राईज’ जाहीर होतो. यात सोलापूरच्या परितेवाडी शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना 7 कोटी रुपयांचा हा पुरस्कार जाहीर होतो आण असा पुरस्कार मिळणारे रणजितसिंह पहिलेच भारतीय शिक्षक ठरतात.

जगभरातील 140 देशांतील 12 हजारहुून अधिक शिक्षकांच्या नामांकनातून अंतिम विजेता म्हणून डिसले गुरुजींची घोषणा करण्यात येते. QR कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्रचं नव्हे तर देशातील शिक्षण क्षेत्रात अभिनव क्रांती केलेल्या कामाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर होतो. आणि एवढंच नाही

पुरस्काराच्या एकूण रक्कमेपैकी 50 टक्के रक्कम अंतिम फेरीतील 9 शिक्षकांना देण्याचे रणजीतसिंह डिसले (Ranjit Singh Disle) जाहीर करतात, यामुळे 9 देशांतील हजारो मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाईल. आणि एवढंच काय डिसले गुरुजीं मिळालेली रक्कम ते टीचर इनोव्हेशन फंडकरता वापरणार आस सांगतात त्यामुळे शिक्षकांमधील नवनवीन प्रयोग करण्यास चालना मिळेल आस त्यानं वाटत शिक्षक स्वतःपेक्षा विद्यार्थ्यांच्या आशाआकांक्षांची काळजी करणारतात तेही एवढं निरपेक्ष, स्वार्थशून्य होऊन हे डिसले गुरुजींच्या कार्यातून दिसून येत.

जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक रणजित डिसले गुरुजी आणि त्यांच्या सारखे आणेक गुरू/ शिक्षक शत्रू-शत्रू राष्ट्रीय संबंध सुधारण्यासाठी आर्थात मैत्रीचे व्हावेत म्हणून प्रेयत्न करत आहेत जस की भारतीय शिक्षक भारतीय विद्यार्थ्यांसाठी तर शत्रुराष्ट्रीय (पाकिस्तानी) शिक्षक शत्रुराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे मनोबला ओळाखण्यासाठी अभ्यास करतात आणि मैत्री संबंध वाढवण्यास इथून सुरूवात होते विद्यार्थ्याच्या निरगस्तेवर जात, धर्म, वंश,वर्ण (देश) हे वेगेळ नाही आपण सगळे एक आहोत आस सांगितलं जातं हा बदल शिक्षकच करु शकतात नाही तर जगाचा तालिबान (अफगानिस्तान) होयला वेळ नाही लागणार.

ऐश्वर्या बनसोडे

Leave A Reply