NALCO NAMSYA : नाल्को नामस्य मोबाईल अँप

सूक्ष्म आणि लघु उद्योगांच्या समर्थनार्थ एक अभिनव व्यासपीठ

NALCO NAMSYA
NALCO NAMSYA

खाण मंत्रालयाच्या (Ministry of Mines)

अतर्गत नवरत्न दर्जा असलेले सीपीएसई अर्थात केंद्रीय सार्वजनिक क्षेत्र उपक्रम नॅशनल अल्युमिनियम कंपनी लिमिटेड (नाल्को), ‘नाल्को मायक्रो अँड स्मॉल एंटरप्राइझ योगायोग अँप्लिकेशन’ ( NAMASYA) नावाचे द्विभाषिक अॅप केवळ कंपनीच्या सूक्ष्म आणि लघु उद्योग विक्रेत्यांच्या फायद्यासाठी विकसित करून एक आधुनिक आणि नाविन्यपूर्ण व्यासपीठ प्रदान करत सूक्ष्म आणि लघु उद्योगांना (एमएसई) बळकट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

 

केंद्रीय खाण, कोळसा आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी एमएसई समुदायापर्यंत पोहचण्यासाठी तसेच देशातील खाण आणि खनिज क्षेत्रातील परिसंस्थेच्या विकासासाठी नाल्कोच्या प्रयत्नांची प्रशंसा केली.

नामस्य अॅप हे सूक्ष्म आणि लघु उद्योगांच्या विकासासाठी कंपनी करत असलेले प्रयत्न  ठळकपणे मांडण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करते. हे अॅप सूक्ष्म आणि लघु उद्योगांना विक्रेता नोंदणी प्रक्रियेविषयी आवश्यक माहिती, तसेच तांत्रिक तपशिलासह त्यांच्याद्वारे पुरवल्या जाऊ शकणाऱ्या वस्तू, विक्रेता विकास आणि नाल्कोचे प्रशिक्षण कार्यक्रम जाणून घेण्यास सक्षम करते.

Made In India’ 5G : एअरटेल आणि टाटा ग्रुप करणार भारतासाठी 5 जी नेटवर्क सोल्यूशन्स
Free Fire Max Pre-Registration : फ्री फायर मैक्स प्री-रजिस्ट्रेशन सुरु , गेम खेळणाऱ्यानामोठी बक्षीसे

एक जबाबदार कॉर्पोरेट आणि भारतातील अग्रगण्य उत्पादक आणि अॅल्युमिना आणि अॅल्युमिनियमचे निर्यातक (Exporters of alumina and aluminum) म्हणून, कंपनीने व्यवसाय करण्याची प्रक्रिया सुलभ करण्याच्या दिशेने विशेषत: खाण आणि धातूच्या व्यवसायातल्या एमएसई क्षेत्रासाठी आणि त्याच्या परिसंस्थेत सर्वसमावेशक वाढ आणि शाश्वत विकासासाठी अनेक पावले उचलली आहेत.

 

 

Leave A Reply