कविता आणि मी । कविता कविता मराठी , Kavita Marathi

कविता आणि मी । कविता कविता मराठी , Kavita Marathi

sad woman


  कविता आणि मी 
ती ही चारकपोट्यासारखी वहीतच बंधिस्त असते..
भावांनानी ठेसून उंचबळून आलेली !!
वाकड्या नजऱ्या पडतील म्ह्णून 
कधी बाहेरही येत नाही ती !!
लोक नाव ठेवतील म्ह्णून जवळच्या काहींनाच माहित आहे ती ।।
सटवाईन लिहून ठेवलय,, 
ऊबरठ्याच्या आताच बरी आहेस बाई तू …
त्यांना मला वाचायच म्हणटल
तरी कोसल्यासारखं होत ।।
कधी व्यक्त व्हावं म्हणाल,,
तर मनाही विकृत असतात त्यांची..  
कधी कोणाला कळेलच,,
तर नातं विचारतात लोक ।।
बेईमान बेईज्जत होऊन गप्पच बसाव लागलं..
कधी हासूड तर कधी विचारांच्या
तत्कात अडकुन बसाव लागत ।।
चाचपटत का होईना आज तिला थोडं बाहेर येऊदेत,,
अस्तिव तिलाही आहे हे ही आज समजूदेत ।। 
        ऐश्वर्या बनसोडे 🍁
             
Leave A Reply