गणपती बाप्पा कविता मराठी – Ganpati Bappa Poetry Marathi

गणपती बाप्पा कविता मराठी – Ganpati Bappa Poetry Marathi

गणपती बाप्पा कविता मराठी
गणपती बाप्पा कविता मराठी

🌺 गणपती बाप्पा 🌺

श्रावण मास येताच सुरू होते उत्सवाची तयारी ।

कारण भाद्रपद महिन्यात येते माझ्या लाडक्या बाप्पाची स्वारी।।

बाप्पा तू येता घरी ।

हर्ष दाटे माझ्या उरी।।

विराजमान झाले हे साजिरे रूप ।

वक्रतुंडा तुझ्या येण्याने भक्तांना लाभले सुख ।।

तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता

तू विघ्नहर्ता, तू विघ्नविनाशका

एकदंत तू , तू लंबोदर

वरदहस्त तुझा राहूदे सर्वांवर

ढोल-ताशा च्या गजरात मिरवणूक तुझी निघाली ।

बाप्पा तुह्या आशीर्वादाने आनंदाची बरसात झाली ।।

गोड गोड लाडू अन् मोदक केले तूला खायला ।

शब्दच अपूरे पडतायेत तुझे वर्णन करायला ।।

पूर्ण झाली माझी मनोकामना ।

अगाध लीला तुझी गजानना ।।

गजमुखा साज तुला शब्दांचा चढविते।

मस्तक तुझ्या चरणाशी ठेवून वंदन तुझ करिते।।

– वैभवी कपिल दळवी.

Leave A Reply