ganeshotsav marathi essay :आमच्या घरचा गणेश उत्सव ,गणेशोत्सव मराठी निबंध ,

गणेशोत्सव मराठी निबंध
गणेशोत्सव मराठी निबंध

आपल्या सगळ्यांच्याच आवडीचा सण म्हणजे गणेश उत्सव (Ganesh Utsav).गणपती बाप्पा मला खूप आवडतो.महाराष्ट्रातला पारंपारिक वर्षानुवर्षे चालत आलेला हा सण आहे.गणपती साठी महिनाभर आधीच तयारी ला लागतात सगळे. भाद्रपद महिन्यातील ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात हा सण येतो. गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) च्या दिवशी आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन होते.म्हणून ह्याला गणेश चतुर्थी आणि विनायक चतुर्थी असे देखील म्हणतात.

आम्हाला शाळेत असताना सरांनी सांगितले होत की लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सव सुरू केला. म्हणजे त्या आधी ही गणपती बसत होते परंतु ते फक्त घरात बसायचे.टिळकांनी त्याला सार्वजनिक स्वरुप दिले. कारण त्यांना समाजामध्ये एकोपा निर्माण करावयचा होता.सण उत्सवांनिमित्त सर्व लोकांनी एकत्र यावे, जात,मतभेद,हे सारं विसरून जावे हा त्यामागे हेतू होता.पुण्यातील कसबा गणपती (Kasba Ganpati) ची स्थापना स्वराज्यजननी जीजाऊ मातेने केली.

दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी ही गणपती ची तयारी सुरू झाली. आई आणि आजी ने संपूर्ण घराची साफसफाई करायला घेतली.मी ,दादा,आणि बाबा आम्ही पण आईला मदत करू लागलो. साफसफाई झाली.मग आम्ही बाप्पा च्या डेकोरेशन तयारी करू लागलो.बाहेर बाजारात मकर भेटतात पण ते थरमाकोल चे असतात.थरमाकोल पर्यावरणासाठी हानीकारक आहे (Thermocol is harmful to the environment). म्हणून मी आणि दादाने यु-ट्यूब वर पाहून थोडी आजोबांची मदत घेऊन त्यात आमच्या काही कल्पना वापरुन बाप्पासाठी सुंदर असे डेकोरेशन बनवले.

त्यानंतर शाडू च्या मातीची गणपती ची मूर्ती बुक /पसंत केली. गणेशाची आरास करण्यासाठी पूजेचे संपूर्ण साहित्य जसे की, फ़ुलं, फळे, दुर्वा, तोरण, कापूर, पूजेसाठी वस्त्र अशा अनेक गोष्टी आणल्या.

विनायक चतुर्थी च्या दिवशी सकाळी लवकर उठून आवरले.नवीन कपडे घातले.बाप्पा च्या स्वागतासाठी  मी अंगणात रांगोळी काढली. आईने मोदक केले.मग आम्ही मूर्ती आणायला गेलो गणेशाची मूर्ती घेतली आणि ‘ *गणपती बाप्पा मोरया ‘! ‘ मंगलमूर्ती मोरया ‘! ‘ आला रे आला गणपती आला ‘!* असे म्हणत ढोल ताशा वाजवत गणरायाला घरी आणले.गणपती चे डोळे रुमालाने झाकले होते. दारात आल्यावर आईने बाप्पा ची दृष्ट काढली.मग डोळ्यावरचा रुमाल काढून बाप्पाला संपूर्ण घर दाखवले व त्याला विराजमान केले.

आमच्या घरी दहा दिवसांचा गणपती असतो.काहीजण दीड दिवस, पाच दिवस सात दिवसाचा पण बसतात. दहा दिवस रोज सकाळ संध्याकाळ गणपती ची आरती केली.देवाला प्रार्थना केली की सर्वांच भल कर.सर्वांना सुखी,निरोगी ठेव.माझं काही चुकलं तर मला क्षमा कर बाप्पा आणि माझ्या आई बाबांना खूप सुखी ठेव. आई दररोज प्रसादासाठी छान छान पदार्थ बनवत असे.

पण दहा दिवस कधी कसे निघून गेले कळलंच नाही. आणि बाप्पाची विसर्जनाची वेळ झाली. मला तर खूप रडायला येत होते. पण आई बाबा आजी आजोबा सगळ्यांनी मला समजावले. मग मी शांत झाले. आणि बाप्पाला सांगितलं मी तुझी वाट बघतेय तू पुढच्या वर्षी लवकर ये! आमच्या घरचा गणेश उत्सव

– वैभवी

Leave A Reply