चवदार तळे सत्याग्रह मराठी माहिती – Chavdar Tale Satyagraha Marathi Information

महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह कोणी केला ?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे पिण्याच्या पाण्यासाठी सत्याग्रह” करणारे पहिले व एकमेव सत्याग्रही  होते महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह आणि ‘अस्पृश्यतेच्या’ नव्या प्रथा – दृष्टिकोन महाडच्या चवदार तळ्याचा ऐतिहासिक सत्याग्रह 20 मार्च 1927 या दिवशी केला होता .त्यानंतर २० मार्च हा दिवस सामाजिक सबलीकरण दिन तसेच ‘समता दिन’ म्हणून साजरा केला जातो.

चवदार तळे

चवदार तळे कोठे आहे ?

चवदार तळे हा महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील महाड शहरात असलेला एक ऐतिहासिक तलाव आहे. येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह इतिहासात प्रसिद्ध आहे. या सत्याग्रहाला महाडचा सत्याग्रह या नावानेही ओळखले जाते. … बाबासाहेब आंबेडकर यांनी येथे सत्याग्रह केला.

महाड नगरपालिकेचे अध्यक्ष सुरेंद्रनाथ टिपणीस यांनी सार्वजनिक जागा अस्पृश्यांसाठी खुली असल्याचे जाहीर केले आणि इ.स. १९२७ मध्ये आंबेडकरांना महाड येथे बैठक घेण्याचे आमंत्रण दिले. बैठकीनंतर ते चवदार तळ्यावर गेले. आंबेडकरांनी तलावातील पाणी प्यायले आणि हजारो अस्पृश्य लोकांनी त्यांचे अनुसरण केले.

समाजातील काही उच्च वर्णिय लोकांनी ‘अस्पृश्य लोकांनी तळ्यातील पाणी घेऊन तळे प्रदूषित कले’ असे मत मांडले. त्यानंतर तळे शुद्ध करण्यासाठी गोमूत्र आणि शेण वापरले गेले, ब्राह्मणांनी मंत्र पठण केले. त्यानंतर तळे उच्च जातीच्या पिण्यासाठी योग्य असल्याचे घोषित केले.

आंबेडकरांनी २६-२७ डिसेंबर रोजी महाड येथे दुसरी परिषद घेण्याचे ठरविले. पण काही उच्च वर्णियांनी ते तळे खासगी मालमत्ता सांगुन आंबेडकरांवर गुन्हा दाखल केला. प्रकरण न्यायालयात असल्याने त्यांचा सत्याग्रह चालू ठेवता आला नाही.

२५ डिसेंबर रोजी (मनुस्मृती दहन दिन), आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रोब्धे यांनी निषेध म्हणून मनुस्मृती या हिंदू कायद्याच्या पुस्तकाचा दहन केले. डिसेंबर १९३७ मध्ये, मुंबई उच्च न्यायालयाने असा निर्णय दिला की अस्पृश्यांना तळयामधून पाणी वापरण्याचा अधिकार आहे. (विकिपीडिया )

 

 

1 Comment
  1. […] चवदार तळे सत्याग्रह मराठी माहिती – Chavdar… […]

Leave A Reply