भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये मोठी भरती

Bharat Heavy Electricals Limited
Bharat Heavy Electricals Limited

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडने (BHEL) जाहिरात प्रसिद्ध केली आहे. कंपनीने एम्प्लॉयमेंट न्यूज वीक ४ सप्टेंबर ते १० सप्टेंबर २०२१ मध्ये दिलेल्या जाहिरातीनुसार, सिव्हिल इंजिनीअरिंग ट्रेडमध्ये पूर्णपणे निश्चित मुदतीच्या नियुक्तीसाठी अभियंता आणि पर्यवेक्षकांच्या एकूण २२ पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. २४ सप्टेंबर रोजी किंवा त्यापूर्वी हे अर्ज पाठवले जाऊ शकतात. तथापि, अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ८ ऑक्टोबर २०२१ आहे

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (Bharat Heavy Electricals Limited) मध्ये अभियंता आणि पर्यवेक्षक पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी कंपनीच्या भरती पोर्टल careers.bhel.in वर दिलेल्या लिंकवरून अर्ज डाउनलोड करणे आवश्यक आहे. हा फॉर्म पूर्ण भरुन सांगितलेल्या कागदपत्रांसह २४ सप्टेंबर २०२१ पर्यंत जाहिरातीत दिलेल्या पत्त्यावर जमा करावा.

Regular Recruitment

Leave A Reply