नागपंचमी निबंध मराठी – nagpanchami essay marathi

श्रावण महिन्यातील पहिला महत्वाचा सण म्हणजे नागपंचमी.

कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्री कृष्णा सुरक्षित वर आले तो दिवस म्हणजे श्रावण शुद्ध पंचमी म्हणजेच नागपंचमी.

वेदकाळापासून चालत आलेला हा सण अत्यंत महत्वाचा मानला जातो.

नाग या प्राण्याबद्दल आदर व पूज्य भावना समाजात रुजविण्यासाठी हा सण पाळला जाण्याची परंपरा आहे.

हे पण वाचा – श्रावण महिन्यातील पहिला सण ,नागपंचमी जाणून घ्या ! नागपंचमी सणाविषयी माहिती

या दिवशी घरोघरी नागराज देवतेच्या रुपात विराजमान होतो. व स्त्रिया एकत्र येऊन नवीन वस्त्रे,अलंकार घालतात, हातावर मेहंदी काढतात.

ते सगळे मिळून च वारुळाजवळ जातात, नागदेवतेची पूजा करताना किंवा स्त्रिया घरीच पाटावर हळद , चंदनाने नाग, नागिण आणि त्यांच्या पिल्लांची चित्रे काढून त्यांची पूजा करतात.

दूध ,साखर,लाह्या ,गव्हाची खीर आणि उकडीची पुरणाची दिंड यांचा नैवेद्य दाखवून नागोबाला प्रसन्न करण्याची प्रथा आहे व आमचे संरक्षण कर अशी प्रार्थना ही करतात.

एका पुरातन कथे प्रमाणे , नागदेवतेने वचन दिले होते की….की जी बहिण माझे भाऊ म्हणून पूजा करेल मी तिचे आणि तिच्या भावाचे रक्षण करेल.

म्हणून या दिवशी  प्रत्येक स्त्री नागाची पूजा करते.

नागपंचमीच्या आदल्या दिवशी स्त्रिया भावाचा उपवास करतात.व या दिवशी प्रत्येक बहिणीने भावासाठी देवतांकडे हाक मारल्यास त्याच्या भावाला नक्कीच लाभ होतो.भावाला चिंतामुक्त आयुष्याची आणि सुखी जीवनाची प्राप्ती होते,आणि त्याला प्रत्येक संकटातून निघण्याची शक्ती येते,हे या उपवास मागचे कारण आहे.

हे पण वाचा – Bhavacha Upvas HD Images : भावाचा उपवास निमित्त खास WhatsApp Status, Facebook Messages

नागपंचमी च्या दिवशी स्त्रिया झाडाच्या फांद्या वर झोका खेळतात.झोका खेळण्यामागील कारण असं की ” जसा झोका वर जातो तसा भाऊ प्रगतीच्या शिखरावर जाऊ दे व जसा झोका खाली येतो तसा भावाच्या आयुष्यातील दुःख कमी होऊ दे.”

नाग किंवा सापांमुळे शेतातील पिकांचे नुकसान करणाऱ्या प्राण्यांपासून संरक्षण होते.

या दिवशी शेतकरी सापांना इजा पोहचू नये म्हणून नांगरत नाही व जमीन खणत नाही.

आणि म्हणूनच सापांसाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही आपण हा सण साजरा करतो.

सापांना न मारता सर्प मित्रांच्या मदतीने त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न करायला हवा तरच खऱ्या अर्थाने हा सण साजरा झाला असे म्हणता येईल .

         ”  रक्षण करूया नागाचे

      जतन करूया आपल्या निसर्गाचे “

 

 

1 Comment
  1. […] नागपंचमी निबंध मराठी – nagpanchami essay marathi […]

Leave A Reply