e-RUPI : मोदींनी लॉन्च केलं ,डिजिटल पेमेंट सुविधा – ई रूपी

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी 2 ऑगस्ट 2021 रोजी सायंकाळी 4:30 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे , एक व्यक्ती आणि उद्देशाने विशिष्ट डिजिटल पेमेंट सोल्यूशन लॉन्च करतील. पंतप्रधानांनी नेहमीच डिजिटल उपक्रमांना समर्थन दिले आहे. वर्षानुवर्षे, सरकार आणि लाभार्थी यांच्यात मर्यादित टच पॉइंटसह, लक्ष्यित आणि लीक-प्रूफ पद्धतीने लाभ त्याच्या इच्छित लाभार्थ्यांपर्यंत पोहचतील याची खात्री करण्यासाठी अनेक कार्यक्रम सुरू केले गेले आहेत. इलेक्ट्रॉनिक व्हाउचरची संकल्पना सुशासनाची ही दृष्टी पुढे नेते.

 

e-RUPI काय आहे ?(What is e-RUPI?)

ई-रूपी ही रोख आणि संपर्क विरहीत डिजिटल पेमेंट सुविधा आहे. ही कयूआर कोड किंवा लघु संदेश सेवा आधारित ई-पावती आहे, जी लाभार्थ्याच्या मोबाईलवर पाठवली जाते. या सोप्या एकरकमी (वन टाइम)  पैसे देण्याच्या प्रणालीच्या वापरकर्त्याना यांची पावती, सेवा प्रदात्याकडून कार्ड, डिजिटल पेमेंट एप किंवा इंटरनेट बँकिंग सुविधा नसतानाही मिळू शकेल. राष्ट्रीय पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने,आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालय आणि राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण तसेच वित्तीय सेवा विभागाच्या मदतीने, आपल्या यूपीआय प्लॅटफॉर्मवर ही सुविधा विकसित केली आहे.

ई-रूपी या सेवा, या सेवेचे पुरस्कर्ते आणि लाभार्थी व सेवा प्रदात्यांना डिजिटल पद्धतीने एकमेकांशी जोडते. त्यामुळे या कोणाचाही एकमेकांशी प्रत्यक्ष संबंध येत नाही. तसेच सेवा प्रदात्याचे पेमेंट व्यवहार पूर्ण झाल्यानंतरच होईल, हे ही यात सुनिश्चित केले आहे. या सुविधेचे स्वरूप प्री पेड असल्याने, या अंतर्गत, सेवा प्रदात्याला कोणत्याही मध्यस्थाविना  वेळेत पेमेंट होईल, हे ही यात निश्चित करण्यात आले आहे.

हे वाचा12 वीच्या निकाल उद्या,निकाल पाहण्यासाठी हे गरजेचे इथे करा चेक

कल्याणकारी सेवांच्या अंमलबजावणीसाठी एक गळती-रहित, उपक्रम म्हणून ही सुविधा डिजिटल क्षेत्रात एक क्रांतिकारक उपक्रम ठरण्याची अपेक्षा आहे. ही सेवा, महिला आणि बाल कल्याण योजनेअंतर्गत औषधे आणि पोषक आहार देण्यासाठी तसेच, क्षयरोग उच्चाटन कार्यक्रम, आयुषमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत औषधे आणि निदान सेवा, खत अनुदान योजना इत्यादी सेवांच्या अंमलबजावणीसाठी या ई-रूपी सुविधेचा उपयोग होईल.

खाजगी क्षेत्रातील कंपन्याही या डिजिटल पावतीचा वापर त्यांचे कर्मचारी कल्याण आणि कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी कार्यक्रमासाठी करु शकतील.

 

Leave A Reply