एकतर्फी प्रेमातून बाहेर कसे पडावे ? How to get out of one-sided love ?

हा प्रश्न बऱ्याच जणांच्या बाबतीत असेच होते आणि आपल्याला शेवटी हा प्रश्न पडतो ,यासाठी वाचा संपूर्ण माहिती .

एकतर्फी प्रेमातून बाहेर कसे पडावे ?(How to get out of one-sided love)

 

एकदा एक मुलगा एका मुलीच्या प्रेमात पडतो. ती मुलगी इतकी सुंदर तर नसते पण त्याला ती परफेक्ट वाटते. ही गोष्ट त्याच्या मित्रांना माहित होती. एक दिवस त्याचे मित्र त्याला बोलतात, तू तिच्यावर एवढं प्रेम करतोस एकदा तिला विचारून बघ. तो तिला याविषयी विचारतो आणि ती नकार देते. त्याच्या मित्रांना वाटत आता हा ड्रिंक करेल, डिप्रेशन मध्ये जाईल. परंतु असं काहीच होत नाही. त्याचे मित्र त्याला विचारतात की तुला याच वाईट नाही का वाटल? त्यावर तो उत्तर देतो, “इतकं नाही की मी डिप्रेशन मध्ये जावं कारण मी अशा मुलीला गमावलं जी माझ्यावर प्रेमच करत नाही. पण त्या मुलीने अशा मुलाला गमावलं जो तिच्यावर जिवापाड प्रेम करतो. “

हे पण वाचा – श्रावणातील पावसाची वैशिष्ट्ये , का खास आहे,श्रावण महिना

हे पण वाचा – झिका विषाणू काय आहे ? जाणून घ्या झिका विषाणूची लक्षणे

तुम्हाला तुमचं उत्तरं कदाचीत मिळालं असेल.

  1. तुम्हाला आवडणाऱ्या व्यक्तीला तुम्ही आवडलच पाहिजे असा अट्टाहास नको. कारण प्रेम हि एक भावना आहे (Love is an emotion) ती जबरदस्ती नाही होऊ शकत.
  2.  समोरच्याला तुम्ही आवडत नाही याचा अर्थ असा नाही की तुमच्यात काहीतरी कमी आहे , त्याच उत्तरं खूप साधं आहे. त्या व्यक्तीला तुमच्याविषयी तशा भावना नाहीत.
  3.  प्रेम हे आपल संपूर्ण आयुष्य नाहिये. ते आपल्या आयुष्याचा भाग आहे. जसे कुटुंब, आपल ध्येय, आपल स्वप्न, मित्र परिवार बऱ्याच गोष्टी आहेत. पण आपण प्रेमाला इतकं महत्त्व देतो की बाकी गोष्टींकडे दुर्लक्ष होत.
  4. स्वतः वर प्रेम करायला शिका. स्वतःच ध्येय पूर्ण करण्याकडे लक्ष द्या. अवघड असत खुपचं, पण अशक्य नसत. मी हे फक्त बोलत नाही मी त्या वातावरणातून गेलीय आणि म्हणूनच उशिरा का होईना मी या प्रश्नाच उत्तर देत आहे.
  5. जर देवाकडे प्रार्थना करूनही ती व्यक्ती तुम्हाला मिळत नसेल तर कदाचीत तुमच्यावर प्रेम करणाऱ्या एखादया व्यक्तिच्या प्रार्थनेमध्ये जास्त ताकत आहे.
  6.  नेहमी सकारात्मक दृष्टिकोन (Positive attitude) असला पाहिजे. जे होत ते चांगल्यासाठीच होत. आपल्या आयुष्यात येणारी संकटे , अडचणी, वाईट वेळ, वाईट लोक हे आपल्याला काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखवण्यासाठी येतात.

 

एकतर्फी प्रेमातून बाहेर कसे पडावे?
एकतर्फी प्रेमातून बाहेर कसे पडावे?

संदर्भ : कोरा या लोकप्रिय प्रश्न उत्तराच्या वेबसाइट वर अंकिता भिलारे यांनी लिहलेले हे उत्तर

1 Comment
  1. Ganesh says
Leave A Reply