गुगल पे कस्टमर केयर नंबर – google pay customer care number

Google Pay itech marathi
Google Pay

गुगल पे काय आहे ? (What is Google Pay?)

भारतासाठी तयार केलेले, तुम्हाला आवडणारी सर्व वैशिष्ट्ये, रीवॉर्ड्स आणि इतर बरेच काही असणारे. Google Pay हा तुमच्या कुटुंबाला घरी पैसे पाठवण्याचा, तुमचा मोबाइल रीचार्ज करण्याचा किंवा शेजारच्या चहावाल्याला पैसे देण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे.

कोणालाही पैसे पाठवण्याचा किंवा कोणाकडूनही पैसे मिळवण्याचा सोपा मार्ग अगदी कोणालाही, कोणत्याही शुल्काशिवाय थेट तुमच्या बँक खात्यातून पैसे पाठवा किंवा मिळवा. तुमचा संपर्क Google Pay वर नसला तरीही तुम्ही पैसे पाठवू किंवा मिळवू शकता. मित्रासोबत केलेल्या जेवणाचे अर्धे पैसे द्या, भाडे भरा किंवा आईला पैसे पाठवा.

हे पण वाचाच – Paytm क्रेडिट कार्ड लॉन्च, जाणून घ्या काय काय आहेत ऑफर !

गुगल पे कसे वापरावे ? (How to use Google Pay?)

Google Pay वापरणे खूप सोप्प आहे .

 • गुगल प्ले स्टोर मधून गूगल पे अँप डाउनलोड करा .
 • सुरक्षेसाठी तुमचे स्क्रीन लॉक सेट करा.
 • तुमचे बँक खाते लिंक करा
 • आता वापरण्यासाठी तयार!
 • पैसे घ्या आणि पाठवा .रिचार्ज करा बिल भरा

गूगल पे बँक खाते कसे जोडावे (How to Add a Google Pay Bank Account)

 1. तुमच्या बॅंकेमध्ये UPI स्वीकारले जात असल्याची खात्री करा. ते स्वीकारले जात नसल्यास, तुमचे बॅंक खाते Google Pay सोबत काम करणार नाही.
 2. Google Pay  अँप मध्ये जा .
  टीप: तुम्ही अ‍ॅपची नवीनतम आवृत्ती वापरत असल्याची खात्री करा. तुम्हाला खात्री नसल्यास, अ‍ॅप अपडेट करणे हे करण्याचा प्रयत्न करा.
 3. सर्वात वर उजवीकडे, तुमचा फोटो असेल तिथे   बँक खाते वर टॅप करा.
 4. बँक खाते जोडा वर टॅप करा.
 5. सर्व बँकांची यादी मधून तुमची बँक निवडा. तुम्हाला तुमची बँक दिसत नसल्यास, ती सर्च करा
  टीप: तुम्हाला Google Pay ला तुमच्या बँकेला पडताळणी एसएमएस पाठवण्याची परवानगी द्यावी लागू शकते.
 6. या साठी तुमचा मोबाईल नंबर हा बँकेत लिंक असावा व त्या सिम मध्ये बॅलन्स असणे गरजेचे आहे ,
 7. sms व्हेरिफाय झाल्यावर तुमचे खाते ऍड होईल .

हे वाचा – Google Pay वापरत आहात तर ही काळजी नक्की घ्या

गुगल पे कस्टमर केयर नंबर (google pay customer care number)

घोटाळे आणि हॅकिंगपासून संरक्षण देणारी, जागतिक दर्जाची सुरक्षा प्रणाली लाभलेल्या Google Pay मध्ये तुमचे पैसे सुरक्षित राहतात. फिंगरप्रिंटसारख्या तुमच्या स्क्रीन लॉकसह तुमचे खाते सुरक्षित करा. मदत हवी असल्यास  सपोर्ट तज्ञांशी संपर्क साधण्यासाठी कृपया अ‍ॅपमधील ‘मदत आणि फीडबॅक’ ला भेट द्या

आपण २४/७ टोल-फ्री सपोर्ट नंबर वर संपर्क साधा: १-८००-४१९-०१५७ 

 

Leave A Reply