Gatari Amavasya 2021 गटारी । आषाढ अमावस्या। दीप अमावस्या कधी आणि कशी साजरी करायची

यंदाची गटारी म्हणजेच दीप अमावस्या कधी आहे माहित आहे ? कशी साजरी करायची ? Gatari Amavasya 2021 चे महत्त्व काय आहे ? बघुयात

Gatari Amavasya 2021:थोड्याच दिवसात मराठी महिन्यां मधील महत्वाचा महिना श्रावण महिना सुरु होणार आहे. हिंदु धर्मात श्रावण महिना खुपच महत्वाचा आणि शुभ मानला जातो. सर्व सणांचा विचार केला तर बऱ्यापैकी बरेच सण या महिन्यात असतात. हा महिना पवित्र मानला जात कारणाने बरेच लोक श्रावण महिना पाळतात जसे कि नॉनव्हेज खात नाही, मद्यपान करत नाही. म्हणुन आषाढ महिन्याच्या शेवटपर्यंत म्हणजेच आषाढी अमावस्या (Gatari Amavasya )पर्यंत नॉनव्हेज, मद्यपान करून घेतात कारण श्रावण महिन्यांनंतर गणपती येतात आणि तेव्हा पण नॉनव्हेज खाणे आणि मद्यपान करणे वर्ज्य मानले जाते.

दीप अमावस्या कधी आहे (When is the Deep New Moon?)

बरेच लोक आषाढ अमावस्या ला गटारी अमावस्या असे ओळखतात. आषाढ अमावस्या दीप अमावस्या म्हणुन देखील ओळखली जाते. यंदाची गटारी अमावस्या सुट्टीच्या दिवशी असल्याने नॉनव्हेज लव्हर्स तसेच मद्यप्रेमी नक्कीच खुश असतील.

आषाढ अमावस्या किंवा दीप अमावस्या किंवा Gatari Amavasya 2021 गटारी अमावस्या शनिवारी ७ ऑगस्ट संध्याकाळी ७:११ मिनिटांनी सुरु होणार आहे.
ते
८ ऑगस्ट संध्याकाळी ७:१९ मिनिट पर्यंत आहे.

हे पण वाचा – श्रावणातील पावसाची वैशिष्ट्ये , का खास आहे,श्रावण महिना

दीप अमावस्या चे महत्व (Significance of Deep Amavasya)

दिवा मांगल्याचे प्रतीक आहे. दीप अमावस्या म्हणजे आषाढ अमावस्या होय. या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते. या दिवशी घरातील दिव्यांना दूध पाण्याने धुऊन स्वच्छ करावेत.

आषाढ अमावस्या किंवा Gatari Amavasya गटारी अमावस्याला दीप अमावस्या म्हणतात. दीप अमावस्या चे वेगळेच महत्त्व आहे. या दिवशी घरातील सर्व दिवे घासुन पुसुन घेतात. आणि संध्याकाळी ७,९,११ च्या आकड्यात कणकेचे दिवे तयार करून सर्व दिवे देवाजवळ लावतात आणि पूजा करतात.

1 Comment
  1. […] हे पण वाचा – दीप अमावस्या कधी आणि कशी साजरी करायची […]

Leave A Reply