देवमाणूस : सरू आजीच्या म्हणी । Saru Aji Dialog

चव ना धव अन पोट भर जेव

अंगात नाही बाळ अन चिमटा काढून पळ

रंग झाला फिका कोणी देईना मुका

आपलीच मोरी अन धुवायची चोरी

पळणाऱ्याची एक  वाट अन धावणाऱ्याच्या बारा वाटा

घेणं ना देणं गावभर फिरून येणं

वेळ ना वखत अन गाढव चाललंय भुकत

नुसत्याच मोठ्या मोठ्या बाता अन येळेला घाली लाथा

चावडीवर बोलायचं आन कोणाला सांगु नको बोलायचं

जिकडं गुलाल तिकडं उद उद अन खोबर तिकडं चांगभलं

आपण दोघे भाऊ अन गाठोड्याला नको हात लावु

बारा लुगडी अन सादा उघडी

बांधला मनीं  अन झाला धनी

शेंबूड जाईना नाकाचा अन शब्द मात्र टोकाचा

आपलं नाय धड अन शेजाऱ्याची कड

ग्यान सांगे लोकाला अन शेंबूड आपल्या नाकाला

देव बी नेईना आणि घरात कोणी चहा बी देईना

तोंडात गोड अन मनात खोड

कानाचा हलकट आणि तोंडाचा बोलकट

घेणं न देणं अन फुकटच मधे बोलणं

कश्यात काय अन फाटक्यात पाय

येडं पेरलं अन उगवलं खूळ

राजाच्या बायकोला भिकेचं डोहाळ अंथरून सोडून भुईवर लोळ

उचलली जीभ लावली टाळ्याला

खाण तशी खापरं अन बाप तशी लेकरं

नवरा जातोय नवरीसाठी अन वऱ्हाड जायत जेवणासाठी

अंगात नाही करणी अन मला म्हणा तरणी

आधीच हौस अन त्यात पडला पाऊस

कानात बुगडी अन गावात फुगडी

पादऱ्याला पावट्याच निमित्त

डोळ्यात केर आणि कानात फुंकर

खातंय बोकडावानी अन दिसतंय लाकडावानी

चेहरा भोळा अन भानगडी सोळा

खाणं बोकडाचा अन रंग लाकडाचं

Leave A Reply