Doodhsagar Waterfall रेल्वे वर धबधबा कोसळला ,रोमांचित करणारा विडिओ

गोवा : सध्या देशभरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस (The rain) होत आहे ,महाराष्ट्र आणि शेजारच्या च्या राज्यांमध्येही पाऊस (The rain) चांगलाच बसरत आहे. यामुळे अनेक ठिकाणी कडेकपारी आणि डोंगररांगांमधून धबधबे (Waterfall) वाहण्यास सुरुवात झाली आहे.

अशातच ,दूधसागर धबधबा ठिकाण चा एक विडिओ समोर आला आहे .

हा धबधबा इतक्या तीव्रतेनं प्रवाहित झाला की, अक्षरश: त्याजवळून जाणारी रेल्वेही काही क्षणांसाठी थांबवण्यात आली. सोशल मीडियावर त्यासंबंधीचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये रेल्वे धबधब्याजवळून जात असतानाच पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्यामुळं गती कमी करत रेल्वे थांबवण्यात आली. यासंदर्भात झी २४ तास चे वृत्त 

दूधसागर धबधबा

दूधसागर धबधबा भारतातील गोवा राज्यातील मांडोवी नदीवरील धबधबा आहे. हा धबधबा पणजीपासून ६० किमी अंतरावर आहे. हा धबधबा मडगाव-बेळगाव लोहमार्गावर असून मडगावच्या पूर्वेला ४६ किमी आणि बेळगावच्या दक्षिणेला ८० किमी अंतरावर आहे. दूधसागर धबधबा भारतातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक असून त्याची उंची ३१० मी (१०१७ फूट) आणि सरासरी रुंदी ३० मी आहे.हा धबधबा पश्चिम घाटातील भगवान महावीर अभयारण्य आणि मोल्लेम राष्ट्रीय उद्यानामध्ये आहे. हा भाग जैवविविधतेने संपन्न असलेल्या घनदाट जंगलांनी वेढलेला आहे. उन्हाळ्यामध्ये हा धबधबा अतिशय नेत्रदीपक नसला, तरी पावसाळ्यामध्ये विशेषतः ऑगस्ट मध्ये याचे दृष्य विलोभनीय असते. दुधसागर धबधबा बराच प्रसिद्ध असल्याने येथे दरवर्षी ८ ते १० हजार स्थानिक तसेच विदेशी पर्यटक भेट देत असतात. हा धबधबा अभयारण्यात असल्याने तेथे जाण्यासाठी वन खात्याची परवानगी घ्यावी लागते.

 

Leave A Reply