श्रावणातील पावसाची वैशिष्ट्ये , का खास आहे,श्रावण महिना

यावर्षी  राज्यात 9 ऑगस्ट 2021 पासून श्रावण महिन्याला (Shravan Maas) सुरूवात होत आहे. हिंदू धर्मीयांसाठी श्रावण महिना हा पवित्र महिन्यांपैकी एक आहे. या महिन्यात सण, व्रत समारंभांची रेलचेल असल्याने एकूण सारीकडे उत्साहाचे, जल्लोषाचे, आनंदाचे वातावरण असते.

श्रावण महिन्यातील पाऊस देखील काही विशेष असतो .याबद्दलच आज आपण संपूर्ण पोस्ट पाहणार आहोत .

श्रावण महिन्याची विविध रूपे (Various forms of Shravan month)

श्रावणाला हिंदीत सावन म्हणतात, संस्कृतमध्ये श्रावण आणि नभ असे कमीतकमी दोन शब्द आहेत.

श्रावणामध्ये पावसाच्या दोन कजोदार सरींच्या दरम्यान चक्क ऊन्ह पडते. दिवसभर हा ऊन-पावसाचा खेळ चालू असतो. श्रावणाचे ऊन नेहमीच कोवळे असते. ते ज्याला सोसत नाही ती व्यक्ती खरोखरच नाजूक असली पाहिजे. या श्रावणातल्या उन्हाचा कोवळेपणा आणि स्त्रीचा नाजूकपणा एकत्रितपणे दर्शवणारी कवी ना.धों. महानोर यांची लावणी ‘श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना’ आशा भोसले यांनी ‘एक होता विदूषक’ या चित्रपटासाठी गायली आहे.

हे पण लवकर वाचा – उद्या बारावीचा निकाल २ ऑगस्स्ट ,असा पहा नवीन वेबसाईट 

श्रावण महिन्यात निसर्गात झालेले बदल (Changes in nature during the month of Shravan)

बालकवींच्या भाषेत सांगावयाचे म्हणजे “श्रावण मासी हर्ष मानसी” असा हा महिना. आनंदाने भरलेला असा हा महिना यास निसर्ग ही समरसतेने साथ देतो असे म्हटले तर उचित होईल.श्रावण म्हणजे उपासतापास, व्रतवैकल्यं, फक्त शाकाहार करणं… गेल्या पिढ्यांचा श्रावण काहीसा काटेकोरपणे पाळण्यातच जायचा. नवी पिढी श्रावणाकडे टिपिकल संकल्पनेपेक्षा वेगळ्या नजरेनं पाहाते. कुणाला श्रावणातला निसर्ग कॅमेऱ्यात टिपायला आवडतो.विविध रंगांचा महिना श्रावण महिन्यात निसर्गाचे विविध रंग अनुभवता येतात. त्यासाठीच श्रावण महिना मला खास वाटतो. श्रावणाला जसा व्रतवैकल्यांचा महिना म्हटला जातो, तसाच तो खास भटकंतीचाही महिना म्हणावा लागेल. म्हणूनच मला निसर्गरम्य ठिकाणांना भेटी देऊन श्रावण सेलिब्रेट करणं अधिक आवडतं. गर्दी-गोंगाट टाळून या दिवसांत कोकणात गेलात, तर डोळ्यांचे पारणे फिटतात. तसाच अनुभव सह्याद्रीतही मिळतो.

हे पण वाचा – श्रावण महिन्यातील पहिला सण ,नागपंचमी जाणून घ्या ! नागपंचमी सणाविषयी माहिती

हे पण वाचा – दीप अमावस्या कधी आणि कशी साजरी करायची

श्रावण महिन्यातील निसर्गाचे वर्णन सांगा

श्रावणात निसर्ग आपल्या अनंत हातांनी सौंदर्याची मुक्तपणे उधळण करीत असतो. निसर्ग ऊन पावसाच्या खेळामुळे अवघ्या धरणीला आनंदाचे तसेच सुशोभितपणाचे वरदान देतो. अवघा निसर्ग टवटवीतपणात न्हाऊन निघालेला असतो. कृष्णवर्णीय मेघांनी गिरीमाथा झाकून गेलेला असतो व त्याचमुळे डोंगरमाथ्याने मंदिल धारण केल्याचा भास होतो

 

Leave A Reply