इतिहास म्हणजे काय ? – What is history ?

इतिहास म्हणजे काय ? – What is history ?

इतिहास म्हणजे भूतकाळातील घटनांची नोंद व ज्ञान होय. व्युत्पत्तीद्वारे दिसून येणाऱ्या अर्थाचा विचार केला तर इतिहास म्हणजे केवळ भूतकाळात काय घडले ह्याची नोंद इतकाच अर्थ निघतो.

इतिहासकार ई. एच. कार यांच्यामते भूतकाळ व वर्तमानकाळ यातील न संपणारा संवाद म्हणजे इतिहास होय.हॅपाल्ड यांच्या मते ‘इतिहास’ हा अनुभवांचा नंदादीप होय.’ इतिहास म्हणजे मानवजातीच्या जीवनप्रवाहाचा अभ्यास असेही म्हणता येते.इतिहास आपल्याला खूप काही शिकवतो किंवा झलेल्या घटना आंपण जरी पहिली नसली तरी  इतिहासामुळे ती आपल्याला कळते . उदा. : छत्रपती शिवाजी महाराजचा  इतिहास  हा खूप मोठा आणि सामर्थ्यचा आहे .

इतिहास म्हणजे काय इयत्ता सहावी

इयत्ता सहावी चे इतिहास पुस्तक डाउनलोड करा 

इतिहास म्हणजे काय इयत्ता सातवी

इयत्ता सातवी इतिहास पुस्तक डाउनलोड करा 

इतिहास विषयाचा अभ्यास करण्यासाठी आपण कोणती साधने वापरतो ?

इतिहासाचे लेखन आणि अभ्यास हा भूतकाळासंबंधी माहिती देऊ शकणाऱ्या विविध साधनांवर अवलंबून असतो. भूतकाळाविषयीची माहिती ज्यातून मिळू शकते अशा साधनांना इतिहासाच्या अभ्यासाची साधने म्हणता येते. भूतकाळाविषयी माहिती देणारी अशी साधने विविध स्वरूपाची असतात. त्यांचे वर्गीकरण विविध निकष लावून करण्यात येते. भूतकाळात घडलेल्या घटनांची कालक्रमानुसार शास्त्रशुद्ध आणि पद्धतशीर दिलेली माहिती म्हणजे इतिहास होय व्यक्ती समाज स्थळ आणि काळ हे चार घटक इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. इतिहास हा विश्वसनीय पुराव्यांवर आधारित असतो या पुराव्यांना इतिहासाची साधने असे म्हणतात. साधनांचे भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने असे वर्गीकरण करता येते. त्याचप्रमाणे इतिहासात साधनांचे मुल्यमापन देखील केले जाते. ज्या ऐतिहासिक घटनेचा अभ्यास करायचा असतो तिच्याशी संबंधित अशा अनेक बाबींचा विचार करावा लागतो. त्यासाठी ऐतिहासिक साधनांचा आधार घेतला जातो, ही साधने तपासून घेणे गरजेचे असते.त्याचा अस्सलपणा तपासावा लागतो. या साधनांचा तारतम्याने व चिकित्सकपणे वापर करणे आवश्‍यक असते.

[ विकिपीडिया ]

इतिहासाची लिखित साधने

प्राचीन लिखित साधनांमध्ये मुख्यत्वे ⇨कोरीव लेखांचा समावेश होतो. हे बहुतेक लेख दगडांवर अथवा विटांवर कोरलेले असून हायरोग्‍लिफिक, क्यूनिफॉर्म, ब्राह्मी, खरोष्ठी वगैरे लिप्यांत ते आहेत. काही लेख पपायरसेवर (ईजिप्त) लिहिलेले आहेत. बहुसंख्य लेख मृतांच्या स्मरणार्थ किंवा अर्पणार्थ कोरले गेलेले आढळतात. मात्र काही लेखांमधून विधिसंहिता (हामुराबीची संहिता) किंवा लष्करी दिग्विजयांचे वर्णन (फेअरो राजांचे पराक्रम) ह्याही गोष्टी आढळतात. लिखित साधनांमध्ये विधिसंहिता, प्राचीन काव्ये, राज्यांच्या जंत्री, वीरकथा, दानपत्रे इ. महत्त्वाचे असून इतिहासलेखनास त्यांचा फार उपयोग झाला आहे. मात्र ह्या साधनांचा उपयोग अत्यंत काळजीपूर्वक करावा लागतो. शिवाय कालानुक्रमाची संगती लावणे हे परिश्रमाचे काम आहे. कारण बहुतेक लेखन दंतकथा व पौराणिक कथांनी युक्त असते आणि त्यांवर धर्माचे वर्चस्व आढळते. तथापि तत्कालीन धार्मिक वा सामाजिक अंगांची माहिती त्यांतून मिळते.

विधिसंहितांत हामुराबीच्या संहितेखालोखाल हिब्रूंचे डेकॅलॉग (दहा आज्ञा), रोमनांची बारा परिशिष्टे, केंट व वेसेक्स येथील राजांचे कायदे हेही महत्त्वाचे आहेत. त्या सर्वांमधून प्राचीन कायदेपद्धतीसंबंधी बरीचशी विश्वसनीय माहिती मिळते. प्राचीन काव्यांत गिलगामेश, इलियड, ओडिसी ही इ. स. पूर्वीची असून बेवूल्फचे डेबोराचे गीत, हेसिअडचे वर्क्‌स अँड डेज आणि ईजिप्शियन स्तोत्रे ही नंतरची आहेत. ह्या काव्यांमधून तत्कालीन समाजस्थितीचे दर्शन घडते. राजांच्या जंत्री, वीरकथा इ. बाबतींत बहुविध साहित्य आतापर्यंत उपलब्ध झाले असून त्यांत जुन्या कराराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. इसवीसनाच्या प्रारंभी समाजात पुरोहितवर्ग हाच केवळ शिक्षित असल्याने व धर्माला प्राधान्य असल्यामुळे त्याला समाजात मानसन्मान असे. तत्कालीन समाजाची दिनदर्शिका (कॅलेंडर) ही मोठी गरज असे. त्याशिवाय कोणताही सण साजरा करणे अशक्य होते. साहजिकच ह्या कॅलेंडर कल्पनेमधून सण, उत्सवांबरोबरच इतर घटनांची नोंद ठेवण्यात येऊ लागली. ह्यामधूनच पुढे ⇨ इतिवृत्तांची परंपरा निर्माण झाली.

इतिवृत्तांत अँग्‍लो सॅक्सन क्रॉनिकल हे महत्त्वाचे असून त्यात ॲल्फ्रेड राजाच्या आज्ञेवरून सॅक्सनांचा इतिहास लिहिण्यात आला. ह्या नंतरच्या इतिवृत्तांत सेंट डेनिस (पॅरिस), सेंट ऑल्बन्झ (लंडन), सेंट गॉल (स्वित्झर्लंड) आणि माँटी कासीनो (इटली) ह्या प्रमुख चर्चनी इतिवृत्ते लिहिली. ह्या चर्चमधील पाद्र्यांनी तत्कालीन घडामोडींची माहिती टिपून ठेवून पुढे ती संग्रहित केली. ह्यांतील मॅथ्यू पॅरिसचे क्रॉनिका मेजोरा हे इंग्रजी इतिहासाचे अत्यंत महत्त्वाचे साधन समजले जाते. राल्फ ऑफ डीस, राल्फ हिजडेन, रॉजर ऑफ वेंडोव्हर, टॉमस वॉल्सिंगअम इत्यादींची इतिवृत्ते त्यामानाने कमी प्रतीची व दुय्यम स्थाने मानण्यात येतात. यूरोपातील प्रत्येक देशाने ही इतिवृत्तपरंपरा पुढे चालविली, त्यामुळे यूरोपच्या मध्ययुगीन इतिहासावर प्रकाश पडतो.

वरील इतिवृत्तांमुळे पुढे प्रसिद्ध चर्चमधील पाद्री आपली आत्मवृत्ते लिहू लागले आणि त्यामागून ख्रिस्ती संतांच्या चरित्रांमधून चरित्र वाङ्‌मय जन्मास आले. मध्ययुगानंतर काही विश्वसनीय चरित्रे बाहेर पडली. ह्यांतील आइनहार्टने लिहिलेले शार्लमेनचे चरित्र, ॲसरकृत ॲल्फ्रेडचे चरित्र, पेम्ब्रुकचे मेम्‌वार्स ऑफ फिलिप द कमिन्स ही काही उल्लेखनीय आहेत. ह्याशिवाय हिस्टरी ऑफ बोहीमिया हे ॲनचे पुस्तक किंवा फ्‍लॉरेन्टाइन हिस्टरी हा मॅकिआव्हेलीचा वृत्तांत हेही तेवढेच महत्त्वाचे आहेत. [मराठी विश्वकोष ]

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.