राज ठाकरे यांच्या 53 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने मनसेच्या वतीने मोफत पुस्तके,अशी करा नोंदणी

 

14 जून 2021 रोजी आपला 53 वा वाढदिवस राज ठाकरे  साजरा करतायत. त्यांच्या 53 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने नवी मुंबई मनसेच्या वतीने 53 हजार घरांमध्ये मोफत पुस्तके संपूर्ण वर्षभर भेट देण्याचा संकल्प नवी मुंबई मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी केलेला आहे. मराठी 100 पुस्तकांची यादीच मनसेने प्रसिद्ध केलेली आहे. त्यामधील आपल्या आवडत्या पुस्तकाची नोंदणी करण्याचे आवाहन मनसेने केले आहे. (Raj Thackeray 53 birthday, MNS Gajanan Kale gift books in 53 thousand houses navi mumbai)

पुस्तके कुणाची मिळणार ?

सुप्रसिद्ध लेखक/कवी मंगेश पाडगावकर, प्रबोधनकार ठाकरे, अण्णाभाऊ साठे, व. पु. काळे, ना. धों . महानोर, आचार्य अत्रे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, विजय तेंडुलकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, कुसुमाग्रज, महात्मा गांधी, साने गुरुजी, वि. स. खांडेकर, डॉ. अब्दुल कलाम, सुरेश भट अशा कवी/लेखकांच्या गाजलेल्या पुस्तकांचा समावेश आहे. यामध्ये श्यामची आई, फकिरा, अग्निपंख, जिप्सी, शूद्र पूर्वी कोण होते, माझी जीवनगाथा, पार्टनर व. पु. काळे, यशवंतराव आणि मी, वाघनखं , सखाराम बाईंडर, माझी जन्मठेप, नटसम्राट, सत्याचे प्रयोग, रंग आणि गंध, रसवंतीचा मुजरा, शिवछत्रपती एक मागोवा अशा अनेक पुस्तके आहेत

मोफत पुस्तके मिळण्यासाठी नोंदणी कशी करायची ?

पुस्तकांची नोंदणी करण्याकरिता मनसेने दोन क्रमांक ९०९०५०५०६७ / ८१०८१८१००७ प्रसिद्ध केलेले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा नागरिक आपले आवडते पुस्तक नोंदवू शकतात.






Leave A Reply

Your email address will not be published.