तुमच्या स्मार्टफोनमधून पसरतोय कोरोना, अशी घ्या काळजी

तुमच्या स्मार्टफोनमधून पसरतोय कोरोना, अशी घ्या काळजी.

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO)कोरोनाला साथीचा आजार घोषित केलंय. जगभरातील कोरोनाचे सावट आता भारतावरही घोंघावतंय. या पार्श्वभुमीवर खबरदारी म्हणून विमानतळावरुन येणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जातेयं. सरकारने देखील यासंदर्भात निर्देश जारी केलेयंत. चीन, इराण आणि दक्षिण आफ्रीकेत याचा प्रादुर्भाव अधिक आहे. या वायरसवर सध्या कोणता उपाय नाही. पण काळजी घेतल्यास याचा प्रादुर्भाव रोखता येऊ शकतो. स्मार्टफोनमुळे देखील हा व्हायरस पसरत असल्याचे समोर आले आहे.

कोरोना व्हायरस कुठूनही पसरु शकतो असे मतं एका वैज्ञानिकाने मांडला. जर तुम्ही तुमच्या स्मार्टफोनला सारखे टच करताय तर आधी हात स्वच्छ धुवा. कारण कोरोना व्हायरस तुमच्यात पोहोचण्याचे हे माध्यम ठरु शकते असेही ते म्हणाले.

कोरोना व्हायरस निर्जीव वस्तूवर एक आठवडा जिवंत राहू शकतो. शिंक आणि खोकल्यातून हा व्हायरस मानवाच्या शरिरातून बाहेर येतो. कोरोना बाधित व्यक्तीच्या थेट संपर्कात आल्याने याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक असते. 

अशी घ्या काळजी

याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तुमचा स्मार्टफोन सॅनिटायझरने स्वच्छ करु शकता. असे करण्याआधी फोन स्वीच ऑफ करा. अल्कोहोलवाल्या कोणत्याही पदार्थाने गॅजेट्स स्वच्छ करु नये.

वायरसपासून वाचण्यासाठी आपल्या लॅपटॉपला देखील स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. यासाठी सर्वात आधी लॅपटॉप बंद करा. 

स्मार्टफोन आणि रुमाल आपल्या एकाच खिशात ठेऊ नका. आपला फोन किंवा लॅपटॉप स्वच्छ केल्यानंतर हात साबण आणि पाण्याने स्वच्छ धुवा. 

सार्वजनिक वाहतुकीचा कमीत कमी वापर करा. सार्वजनिक कम्युटर किंवा सायबर कॅफेचा वापर कमीत कमी करा. सार्वजनिक टॉयलेट्सचा वापर करणे शक्यतो टाळा. 

   

Hair Transplant Cost in Thane Might Actually Surprise YouHair Transplant | Search Ads

News
Zee Hindustan News
Bengali News
Zee Hindustan Tamil News
Malayalam News
Gujarati News
Zee Hindustan Telugu News
Kannada News
Zee Rajasthan News
Zee Bihar Jharkhand News
Zee Uttar Pradesh Uttarakhand News
Zee Madhya Pradesh Chhattisgarh News

Top

Tech News in Marathi. Latest Updates from Technology World related to Smartphones, Apps, Computers, Laptops, Tablets, Cameras, Softwares, VR, AI, WhatsApp internet and telecommunication,Tech News In Marathi : Latest Technology News, Smartphone & Tips : ITech Marathi मराठी टेक न्यूज,marathi tech news,marathi tech update,marathi tech world,marathi tech blogs,मराठी ब्लॉग लिस्ट,marathi blog katta,marathi tech channel,tech marathi youtube, इतेचमराठी ,ITECHMARATHI ,मराठी टेक महेश राऊत ,MAHESH
Leave A Reply

Your email address will not be published.