स्थलांतरित पक्षी माहिती मराठी । Migratory Bird Information Marathi

सुमारे १५९ प्रजातींचे पक्षी स्थलांतर करून भारतात येतात. पक्ष्यांचे स्थलांतर ही पक्षिजीवनामधली एक विलक्षण घटना असते     . पक्षी खाद्यासाठी, हवामान बदलामुळे तसेच पिल्लांच्या प्रशिक्षणासाठीही स्थलांतर करतात. सदा सर्वकाळ अनुकूल परिस्थिती लाभण्यासाठी वसतिस्थानात नियमितपणे आणि आलटून पालटून केलेला बदल म्हणजे स्थलांतर अशी व्याख्या लॅण्ड्सबरो थॉम्सन या शास्त्रज्ञाने केली आहे.पक्षी स्थलांतरादरम्यान मूळ वसतिस्थान ते हिवाळी मुक्काम आणि परत मूळ वसतिस्थान असा प्रवास करतात.  

चक्रवाक पक्षी हिवाळ्यात भारताच्या दक्षिण भागात स्थलांतर करतात. आर्क्टिक टर्न हा पक्षी सर्वांत मोठे स्थलांतर करतो. तो उत्तर ध्र्रूव ते दक्षिण ध्र्रुव व परत उत्तर ध्र्रुव असा जवळ जवळ ३६,००० कि.मी.चा प्रवास एका वर्षात करतो.  सुमारे १५९ प्रजातींचे पक्षी स्थलांतर करून भारतात येतात. 

स्थलांतर करणारे पक्षी नावे

थापट्या, नकटा,शेंडीबदक, लालसरी, थोरले व धाकटे मराल,तरंग, गडवाल, चक्रवाक ही बदके तसेच कादंब व पट्टकादंब हे गूज येतात. चमचा, अवाक, तुतवार, शेकाट्या, कारंडव,उचाट, सोनचिलखा, कुरव असे पक्षी भारतात येतात .

पक्षी त्यांच्या गरजा पूर्ण करतील असे निवासस्थान शोधत असतात . बहुतेक पक्षी भौगोलिक स्थान (प्रजनन स्थानाच्या जवळ), हवामान आणि पावसाच्या आधारे परिचित जमीन-वापर नमुने असलेल्या भागात उड्डाण करतात. महाराष्ट्रात विविध प्रकारचे अधिवास असल्यामुळे ते स्थलांतरित पक्ष्यांच्या विविध गटांना आकर्षित करते.

Join Buttons Join WhatsApp Group Join Telegram Channel

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Scroll to Top